Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री करून कंपनीची 48 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कंपनीच्या सेल्समनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत प्युअर वन वॉटर इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. च्या वाघोली येथील सत्यम पार्कमधील आउटलेटमध्ये घडला आहे.

याबाबत हितेश घनश्याम कुमावर (वय 32, रा. रावेत, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी सतीश हरिराम येरवी (वय 35, रा. लवंगी, मंगळवेढा, सोलापूर) याच्यावर आयपीसी 408 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश येरवी हा फिर्यादी यांच्या कंपनीत एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सेल्स पर्सन म्हणून कामाला होता.
आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीचे वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री केली.
त्याने ग्राहकांकडून मिळणारी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा करून न घेता फोन पे व गुगल पेच्या
माध्यमातून स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतली. आरोपी सतीश येरवी याने कंपनीची 48 लाख 63 हजार
888 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pravah Phulala Sugandha | ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरच्या ‘त्या’ पोस्टची चर्चा; “मी तुला कधीच…”

Pune Crime | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना