Pune Crime | पुण्यातील व्यावसायिकाकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी; पत्रकार शिरसाठ विरूध्द हडपसरमध्ये गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | हडपसर परिसरातील व्यावसायिकाकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी करणार्‍या पत्रकार शिरसाठ विरूध्द पोलिसांनी (Hadapsar Police) खंडणीचा (ransom) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. दरम्यान, दाखल फिर्यादीमध्ये पत्रकार शिरसाठ (Journalist Shirsath) याचे पुर्ण नाव पत्ता माहित नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि 387, 341, 323, 324, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी हडपसर परिसरातील हिंगणेआळी येथे राहणार्‍या 32 वर्षीय व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. हा गुन्हा आज (गुरूवार) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज (गुरूवारी) व्यावसायिक हे घरी असताना त्यांना पत्रकार शिरसाठने फोन केला. तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकत असता, तुम्ही मला 5 लाख रूपये द्या, तुम्ही मला 5 लाख रूपये (extortion) दिले नाहीतर तुम्हाला जड जाईल तुमच्यावर केस करावी लागेल तुम्हाला 5 लाख रूपये द्यावेच लागेल अशी पैशाची मागणी केली. दुपारी साडेचार वाजता व्यावसायिकाचा टेम्पो माळवाडी रोडवर पत्रकार शिरसाठने थांबविला. मालाची पाहणी करून त्याने ड्रायव्हरला हाताने मारहाण करून खल्लास करण्याची धमकी देवुन त्याच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले तसेच टेम्पोच्या पुढची काच फोडून गाडीचे नुकसान केले असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

 

 

पत्रकार शिरसाठच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे.
प्रकरणाची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) करीत आहेत.
दरम्यान, पत्रकारावर 5 लाख रूपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title : Pune Crime | 5 lakh ransom demand from Pune businessman; File case against journalist Shirsath in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update