Pune Crime | रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला स्पिकर बंद केल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की, 5 जणांना अटक; खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सार्वजनिक ठिकाणी स्पिकरवर गाणी लावून नाचणाऱ्या तरुणांमध्ये गाणे लावण्यावरुन वाद झाले. हे वाद मिटवण्यासाठी आणि स्पिकर बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या रात्र गस्तीवरील (Night Patrolling) पोलिसांना (Pune Police) धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) खडकी येथे सोमवारी (दि.2) रात्री अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

सुमित सुभाष मिश्रा, रसल अ‍ॅल्वीस जॉर्ज, वृषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय-23), सिद्धार्थ महादेव लोहान (वय-24) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन समरत बेंदगुडे PSI Arjun Samrat Bendgude (वय-33) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे हे सोमवारी रात्री हद्दीमध्ये रात्रगस्त करत होते.
त्यावेळी त्यांगी शाळेसमोर काही तरुण स्पिकर वरती गाणी लावून नाचत होती.
त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणते गाणे लावयाचे या कारणावरुन वाद सुरु असल्याचे बेंदगुडे यांना दिसले.
त्यांनी स्पिकर बंद करण्यास सांगितले मात्र आरोपींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे बेंदगुडे यांनी स्पीकर बंद केला.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून अंगावर धावून गेले.
तर पोलीस वाहनाचे चालक पोलीस शिपाई जाधव यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडून दमदाटी केली.
तसेच जाधव यांना शिवीगाळ करुन गाडीची चावी काढून घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगदुम (PSI Magadum) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 5 people arrested due to anger over shutting down the late-night speaker; Incident in Khadki area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप