Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून पैसे न दिल्यास बदनामी करुन वाट लावून टाकीन अशी धमकी प्रसिद्ध उद्योगपतीला दिली. तसेच जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी 59 वर्षीय उद्योगपतीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज Rajesh Khairatilal Bajaj (रा. डेक्कन जिमखाना) आणि बापू गोरख शिंदे Bapu Gorakh Shinde (रा. मानाजीनगर, नर्‍हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 16 सप्टेंबर 2021 दरम्यान (Pune Crime) घडला आहे.

राजेश बजाज हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतो. याबाबत उद्योगपतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश बजाज याने वकिलीची सनद नसताना बनावट ओळखपत्र तयार करुन सांकला यांचे वकील पत्र पी एम सी (PMC) येथील दिवाणी न्यायालयात दाखल केले. त्यांच्याकडून 9 लाख 90 हजार रुपये वकिली फी म्हणून घेऊन त्यांचा विश्वासघात केला. हा प्रकार समोर आल्यानंतर सांकला यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर राजेश बजाज व बापू शिंदे यांनी संगनमत करुन बापू शिंदे याने 93 एव्हेन्यू या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा रोख 50 लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली.

 

खंडणी न दिल्यास वानवडी येथील

बांधलेला  प्रकल्प बेकायदेशीरपणे बांधलेला आहे. त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करुन तुमची बदनामी करुन वाट लावून टाकीन.
तुम्हास कधी संपवून टाकेन अशी धमकी दिली.
राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध 400 कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते.
याशिवाय एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती.

Web Title :- Pune Crime | 50 lakh ransom demand from famous Pune businessman; Grabbed flat, know the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून

MP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’