Pune Crime | 200 वाहन चोरी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 36 लाखांच्या 51 दुचाकी जप्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे शहर आणि परिरासह इतर जिल्ह्यात वाहन चोरी (Vehicle theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह घरफोडीच्या (Burglary) गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-robbery squad) मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 36 लाख रुपये किमतीच्या 51 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान मौजमजेसाठी आरोपींनी वाहन चोरी (Pune Crime) केल्याचे उघड झाले आहे.

 

शंकर भिमराव जगले Shankar Bhimrao Jagle (वय-20 रा. हारगुडे वस्ती, चिखली पुणे), संतोष शिवराम घारे Santosh Shivram Ghare (वय-39 रा. ओझर्डे, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी संतोष घारे याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी, अहमदनगर व नाशिक येथे 200 वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर शंकर जगले हा घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर वाहनचोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न असे सात गुन्हे (Pune Crime) दाखल आहे.

 

दरोडा विरोधी पथकाकडून वाहन चोरीच्या गुन्हाच्या तपास सुरु असताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station)
हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे जास्त प्रमाणात घडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे (PSI Mangesh Bhange) यांनी जवळपास 450 हून अधीक सीसीटीव्ही तपासून वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपींची माहिती मिळाली.
दोन व्यक्ती पवना हॉस्पिटल (Pavana Hospital) या ठिकाणी येत असून ते या भागातले नसल्याची माहिती भांगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांना पाहताच आरोपीं दुचाकीवरुन पळून गेले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना ताब्यात घेतले.

 

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली दिली.
आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांची वेळेवेळी पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली.
त्यावेळी त्यांनी चोरलेल्या दुचाकीबाबत माहिती दिली.
पोलिसांनी पुणे शहर, पिंपरी, पुणे ग्रामीण, लोणावळा, व मावळ या वेगवेगळ्या भागातून 51 दुचाकी,
एक रिक्षा आणि एक मोबाईल असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी संतोष घारे हा वयाच्या 17 वर्षापासून वाहन चोरी करत असून त्याच्यावर आतापर्यंत 200 गुन्हे दाखल आहेत.
दुचाकी चोरण्यासाठी तो मास्टर चावीचा (Master key) वापर करत होता.
मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी करत होता. तसेच चोरलेले वाहन शंकर जगले याच्यामार्फत 15 ते 50 हजार रुपयांना विकत होता.
गाडीवर स्वत:च्या गाडीचा नंबर टाकून पैशांची अडचण असल्याचे सांगून गाडी गहाण ठेवत होता.
तसेच ज्या ठिकाणी गाडीतल पेट्रोल संपेल त्या ठिकाणी गाडी सोडून देऊन दुसरी दुचाकी चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

ही कारवाई आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addi CP Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे
(DCP Dr. Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar), दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे (Senior Inspector of Police Uttam Tangde) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे (API Siddheshwar Kailase), पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे,
राजेंद्र शिंदे, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, समीर रासकर,
विनोद वीर, अमर कदम, गणेश सावंत, सुमीत देवकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | 51 two wheelers worth Rs 36 lakh seized from criminals pimpri chinchwad police Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tax Refund | करदात्यांची दिवाळी ! CBDT ने 91.30 लाख करदात्यांना केला 1.12 लाख कोटी रुपयांचा कर परतावा

COVAXIN च्या आपत्कालीन वापराला अखेर WHO ने दिली मंजूरी, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते प्रकरण

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग ‘अवतरले’, अनिल देशमुखांबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा