Pune Crime | राज्य उत्पादन शुल्ककडून पुण्याच्या वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात (Pune Crime) मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) पुण्यातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातून विदेशी मद्याची (Foreign liquor) वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून तब्बल 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.6) करण्यात आली असून कृष्णा तुळशीराम कांदे Krishna Tulshiram Kande (वय-30 रा. मु. अंबील वडगाव, पोस्ट पोथरा, ता. बीड) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात (Pune Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी परिसरातून गोवा राज्यासाठी विक्रीचा परवाना असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारजे माळवाडी परिसरात एका आयशर (एमएच 09 एफएल 2948) वाहनावर छापा टाकला.
या कारवाईत पथकाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या मद्याचे बॉक्स जप्त केले आहे.
पथकाने एकूण 450 बॉक्स, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (state excise commissioner kantilal umap), विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे
(Divisional Deputy Commissioner Prasad Surve), पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे (Pune Superintendent Santosh Jhagde), बीडचे अधीक्षक नितीन घुले
(Beed Superintendent Nitin Ghule)यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क (डी विभागातील) निरीक्षक संजय डेरे, निरीक्षक गणेश केंद्रे,
दुय्यम निरीक्षक योगेंद्र लोळे, दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, स. दु. नि. व जवान समीर पडवळ, महेश बनसोडे, श्राजू पोटे, वाहन चालक अभिजित सीसोलेकर यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Crime | 52 lakh liquor seized from Warje area of Pune by state excise department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sierra Leone Blast | तेलाच्या टँकरमध्ये स्फोट ! 92 लोकांचा होरपळून मृत्यू, 100 हॉस्पिटलमध्ये दाखल (व्हिडीओ)

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार