Pune Crime | शेअर मार्केटमध्ये वर्षात दुप्पट रक्कम देण्याच्या आमिषाने महिलेची 53 लाखांची फसवणूक; सांगलीच्या दोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Indian Share Market) आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा, वर्षात गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून सांगलीच्या (Sangli) दोघांनी एका महिलेची ५३ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी आंबेगाव (Ambegaon) येथील एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद (गु. रजि. नं. ४४९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एस एम ग्लोबल सांगली (SM Global Sangli) या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी मिलींद बाळासाहेब गाढवे (Milind Balasaheb Gadhve) आणि अविनाश बाळासाहेब पाटील (Avinash Balasaheb Patil) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट ते २ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी आहेत. फिर्यादी यांना त्यांच्या मित्रांमार्फत एस एम ग्लोबल कंपनीविषयी माहिती मिळाली होती. त्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला आर्थिक मोबदला मिळतो, याबाबत माहिती मिळाल्यावर त्या कंपनीच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. त्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास कंपनीकडून खात्रीशीर दरमहा परतावा, एका वर्षात दुप्पट, किमान ७७०० किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम गुंतवा असा मजकूर चा मेसेज ग्रुपवर पाहिला. पुणे शहरात सेमीनार व्हायचे. त्या सेमीनारमध्ये कंपनीचे मिलिंद गाढवे, अविनाश पाटील हे मार्गदर्शन करीत.

कंपनीची माहिती देऊन गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास कशाप्रकारे परतावा मिळेल, याची माहिती सांगायचे.
तसेच कंपनीच्या मार्फत झुम मिटिंगमध्ये (Zoom Meeting) कंपनीचा बिझिनेस, रिटेल प्लॅन तसेच आम्ही कंपनीला इतर लोकांना जॉईन केले तर किती कमिशन मिळेल याबाबत माहिती देत असत.
मिलिंद गाढवे याने त्यांना तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या गुंतवणुकीच्या किमान २० टक्के रक्कम ही दरमहा मिळेल.
तसेच ८ ते १० महिन्यांमध्ये गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होईल, अशी माहिती दिली.
त्यांनी ५३ लाख २२ हजार रुपये गुंतवले. त्यासाठी त्यांनी बँकेतून ३८ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले.

त्यांनी पाठविलेली रक्कम एस एम आय डी मार्फत फोरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतविली जायची झालेली गुंतवणुक ही मेटा ट्रेडर ५ या ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना दिसत असे.
त्यांना सुरुवातीला गुंतवणुकीवर ४ लाख रुपयांचा परतावा मिळाला.
त्यानंतर नोव्हेबर २१ पासून गुंतवणुकीचा परतावा येणे बंद केले.
त्यांनी मेटा ट्रेडर ५ वर सर्व खाती उघडून पाहिल्यावर ती सर्व खाती ही झिरो झाली होती.
त्यानंतर त्यांनी मिलिंद गाढवे याच्याशी संपर्क केल्यावर त्याने मला मार्केटमध्ये मोठा तोटा झाला आहे.
मी आता तुमचे पैसे देऊ शकत नाही. पुण्यात माझी काही मालमत्ता आहे.
ती विकून दरमहा ५ लाख रुपये पैसे परत करतो, असे सांगितले होते.
मात्र, त्याने कोणतीही रक्कम परत केली नाही.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस निरीक्षक संगिता यादव तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 53 lakh scam of a woman in the lure of paying twice a year in the stock market Crime against both of them in Sangli

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा