Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 6.25 कोटींची फसवणूक, महिलेसह दोघांवर FIR; एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची (Builders in Pune) सव्वा सहा कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi police) सोल सेलिंग एजंट (Soul Selling Agent) पती पत्नीविरोधात (Husband-Wife) गुन्हा (FIR) दाखल करुन पतीला अटक (Arrest) केली. हा प्रकार 2014 ते डिसेंबर 2020 या कालावधीत स्टार सिटी गृहप्रकल्प, डुडुळगाव (Star City Housing Project, Dudulgaon) येथे (Pune Crime) घडला आहे.

 

समर्थ प्रॉपर्टीजच्या प्रोप्रायटर (Samarth Properties) सुप्रिया सचिन थोरात (Supriya Sachin Thorat), मॅनेजर सचिन हनुमंत थोरात Manager Sachin Hanumant Thorat (दोघे रा. रेलविहार कॉलनी, बिजलीनगर, आकुर्डी Akurdi)
अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहे.
याबाबत कमल जयकिशन जेठाणी Kamal Jaikishan Jethani (वय-37 रा. सिंग सोसायटी, औंध Aundh, पुणे)
यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) मंगळवारी (दि.15) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन सचिन थोरात याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमल जेठाणी यांची आळंदी रोडवरील (Alandi Road) डुडुळगाव येथे स्टार सिटी नावाची बांधकाम साईट (Construction Site) आहे.
यातील ए, बी आणि सी विंगमधील फ्लॅट विक्री करण्याचे काम आरोपींना दिले आहे.
त्यासंदर्भात सोल सेलिंग एजंटचा करारनामा (Agreement) देखील करण्यात आला आहे.
त्यानुसार फ्लॅटच्या किमतीच्या सव्वा टक्के कमिशन आरोपींना देण्याचे ठरले होते.
मात्र आरोपींनी संगनमत करुन बुकिंग करणाऱ्या फ्लॅट धारकांकडून 27 लाख 80 हजार रुपये घेऊन त्याचा हिशोब फिर्यादी यांना न देता सोल सेलिंग करारनाम्याचा भंग केला.

आरोपींनी फ्लॅट बुकिंगची रक्कम फिर्यादी यांच्या राजमाता कन्स्ट्रक्शनच्या (Rajmata Construction) बँक खात्यात जमा न करता प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेच्या रावेत शाखेत (Prerna Co-Operative Bank Ravet branch) जेठाणी यांच्या कंपनीचे बिगर तारखेचे लेटर पॅडवर संमतीपत्र तयार करुन खाते उघडले.
बनावट संमती पत्राच्या आधारे आरोपींनी प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेत राजमाता कन्स्ट्रक्शन च्या नावाने दुसरे समांतर चालू खाते उघडले.

 

फ्लॅट बुकिंगचे 5 कोटी 97 लाख 7 हजार 329 रुपये रक्कम त्या बनावट खात्यात जमा केली.
तसेच हे पैसे चेक, ड्राफ्टद्वारे काढून घेतले.
आरोपींनी फिर्यादी कमल जेठाणी यांची 6 कोटी 24 लाख 87 हजार 329 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे (PSI Rahul Bhandare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 6.25 crore fraud cheating of builder in Pune FIR against two including a woman One arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा