Pune Crime | रस्त्यात थुंकल्याने तलवारीने वार, स्वारगेटच्या गुलटेकडी परिसरातील 6 जणांना दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्यात थुंकल्याने (Spitting) झालेल्या वादातून (Dispute) एकावर तलवारीने (Sword) वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत घडली होती. या गुन्ह्यातील सहा जणांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा (Punishment Of Hard Labor) सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी (Additional Sessions Judge S.S. Gosavi) यांनी ही शिक्षा सुनावली आहे. (Pune Sessions Court)

 

रफिक उमर शेख Rafiq Umar Shaikh (वय- 38), फिरोज गुलाम हुसेन Feroz Ghulam Hussain (वय -33), अफजल उमर शेख Afzal Umar Shaikh (वय-34), मुद्दसर उर्फ सोनू साबीर खान Muddassar alias Sonu Sabir Khan (वय-31), मुन्वर उर्फ मोनू साबीर शेख Munwar alias Monu Sabir Shaikh (वय-31), सद्दाम उमर शेख Saddam Umar Shaikh (वय-31, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना नऊ हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. याबाबत गोवर्धन खुडे (Govardhan Khude) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Pune Crime)

 

काय आहे प्रकरण?

पुणे शहरातील गुलटेकडी येथील डायस प्लॉट वसाहतीमध्ये (Dias Plot Vasahat Gultekdi) 21 ऑक्टोबर 2011 रोजी हा प्रकार घडला होता. आरोपी अफजल हा रस्त्यात थुंकल्याने फिर्यादी गोवर्धन खुडे आणि त्यांचा मामेभाऊ कृष्णा लोंढे (Krishna Londhe) यांनी त्याच्याकडे का थुंकलास अशी विचारणा केली. यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यानंतर आरोपी शेख याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत फिर्यादी खुडे व लोंढे यांना मारहाण (Beating) केली. आरोपींनी खुडे यांच्यावर तलवारीने वार केले तर लोंढे याला दांडके, गजाने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन सहा आरोपींना अटक (Arrest) केली होती.

 

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या कोर्टात झाली. सरकार पक्षाकडून 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. न्यायालयाने साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून सहा आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी आणि 9 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला.

 

Web Title :- Pune Crime | 6 Gultekdi area of ​​Swargate pune criminals Punishment Of Hard Labor Pune Sessions Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा