Pune Crime | ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने तरुणांची 6 लाखांची फसवणूक ! जे एस सी ओव्हरसीज कन्सलटंटच्या संचालकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑस्ट्रेलियात (Australia) नोकरीचे आमिष (Lure Of Job) दाखवून बनावट व्हिसा (Fake Visa) देऊन तिघांची ६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालकांवर गुन्हा (FIR On Directors of JSC Overseas Consultants) दाखल केला आहे (Pune Crime). डॉ. स्नेहा जोगळेकर (Dr. Sneha Joglekar) आणि वरुण जोगळेकर (Varun Joglekar) अशी त्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी खडकवासला (Khadakwasla) येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. डॉ. स्नेहा जोगळेकर व वरुण जोगळेकर यांचे जे एस सी ओव्हरसीज कन्सलटंटचे कोथरुडमध्ये कार्यालय आहे. जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरीता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल (Pune Crime) करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक (Fraud Case) केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-Pune Crime | 6 lakh youth cheated in Australia for job lure Filed a case against the director of JSC Overseas Consultants Dr. Sneha Joglekar and Varun Joglekar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा