Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रॉस ट्रस्टच्या अध्यक्षांच्या नावाने 6 लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रास ट्रस्टचे (Sisters Of The Cross Trust) अध्यक्ष व त्यांच्या ओळखीचे फादर यांच्या नावाने संपर्क केल्याचे भासवून एका महिलेची 5 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका 61 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 206/22) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मेल आयडीवर (Mail Id) फिर्यादीचे सिस्टर ऑफ द क्रास ट्रस्टचे अध्यक्ष ब्रोमादीन (President Bromadine) तसेच ट्रस्टचे ओळखीचे फादर मथायस (Father Matthias) तसेच फादर वॉथर (Father Wother) यांचे मेल आय डी वरुन मेल केलेल्याचे भासविले. तसेच फिर्यादीचे व्हॉट्सॲप नंबरवर फिर्यादीशी स्वत: संपर्क करीत असल्याचे भासविले. फादर मथायस, वॉथर यांचे मित्र ऑपरेशन करीता भारतात येणार असल्याचे सांगून त्यांना भारतीय चलनातील (Indian currency) पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 2 ते 13 डिसेंबर 2021 दरम्यान 5 लाख 95 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. प्रत्यक्षात फादर मथायस व फादर वॉथर यांनी नंतर आपण असे कोणतेही मेल अथवा फोनवर बोललो नसल्याचे स्पष्ट केल्यावर फसवणूक (Cheating Case) झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक सातपुते (Police Inspector Satpute) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 6 lakhs in the name of President of Sisters of the Cross Trust

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tanaji Sawant | ‘आदित्य ठाकरे एक साधा आमदार, मी त्यांना महत्व देत नाही’

 

Diabetes Symptoms | शरीराचा हा भाग पिवळा होऊ लागला असेल तर व्हा अलर्ट, डायबिटीजचा इशारा तर नाही ना?

 

Pune Pimpri Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कडप्पा घालून खून