×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 60 वर्षाच्या 'तरूणा' नं केले शेजारणीला प्रपोज, अश्लील गाणी...

Pune Crime | 60 वर्षाच्या ‘तरूणा’ नं केले शेजारणीला प्रपोज, अश्लील गाणी म्हणून विनयभंग करणाऱ्या शौकिनावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणांकडून तरुणीला प्रपोज करुन विनयभंग (molestation) केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र पुण्यात एक खळबळजनक अन् लज्जास्पद कृत्य एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केलंय. त्याने शेजारी राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेला प्रपोज (Propose) केल्याचा, अश्लील गाणी (Obscene Song) म्हणून तिला त्रास दिल्याने त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत 51 वर्षीय शेजारी राहणाऱ्या महिलेने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरुन 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला दारुचे व्यसन आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील अनेक वर्षापासून वाद आहेत. 22 ऑगस्ट रोजी आरोपी फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. त्याने फिल्मी अंदाजात फिर्यादी महिलेला ‘तु खुप सुंदर दिसते, मला खुप आवडतेस, आपण दोघे फिरायला जावू’ असे म्हणत प्रपोज केले. तसेच अश्लील हावभाव करुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. (Pune Crime)

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ (Abuse) केली.
यावेळी फिर्यादी महिलेने तुम्ही घरात जाऊन झोपा, मला त्रास देवू नका असे म्हटल्यानंतर तिला अश्लील भाषेत शिव्या दिल्या.
तसेच महिलेला ऐकू जातील अशा मोठ्या आवाजात अश्लील गाणी गावून तिला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये जागेवरून वाद असून याप्रकरणात न्यायालयात आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

Web Title :- Pune Crime | 60 year old young man proposes to neighbor FIR against hobbyist who molested her with obscene songs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News