Pune Crime | मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटेनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत 25 लाखाच्या खंडणीची मागणी, महिलेसह 7 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मानवाधिकार (Human Rights) व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी (Corruption Prevention Association) असल्याचे सांगून 25 लाखाची खंडणीची मागणी (Demanding Ransom) केल्याचा प्रकार वाकडमध्ये घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) सात जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला 10 वर्षे जेलमध्ये पाठवण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. हा प्रकार 10 सप्टेंबर रोजी रात्री सात ते साडेनऊ या दरम्यान रामनगर (रहाटणी) येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानात (Pune Crime) घडला.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्ना पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरजाराम रूपाराम चौधरी (वय-37 रा. भंडारी हॉस्पीटलजवळ, तळेगाव दाभाडे,पुणे मुळ रा. राजस्थान) यांनी शनिवारी (दि.11) सकाळी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रहाटणी येथे में. बालाजी टेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. दुकान फिर्यादी यांचा भाऊ सांभाळतात. आरोपी हे कोथरुड पुणे (Kothrud Pune) येथील रहिवासी असून त्यांनी मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन नावाची संघटना सुरु केली आहे, असे आरोपी सांगतात. शुक्रवारी रात्री ते फिर्यादी यांच्या दुकानात आले. दुकानात असलेले चहा आणि इतर साहित्य बनावट आहे. तुम्ही दुकानातून बनावट माल विकत असल्याचे आरोपींनी म्हटले.

तसेच बनावट माल विकल्याप्रकरणी तुमच्या भावाला दहा वार्षासाठी जेलमध्ये पाठवण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी यांना दिली.
तसेच 25 लाख रुपयाची खंडणी मागितली.
आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला धमकावून त्याच्या खिशातील 8 हजार 500 रुपयांची रोख रक्कम देण्यास भाग पाडले.
याबाबत फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार (API Anil Lohar) तपास करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | 7 arrested for demanding Rs 25 lakh ransom for claiming to be Human Rights and Anti-Corruption Organization

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp Voice Transcription | ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर लवकरच येतंय Voice ट्रांन्स्क्रीप्शन फीचर, जाणून घ्या कसं करेल हे अ‍ॅप काम

Earn Money | नोकरीची चिंता सोडून 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 1 लाखाची कमाई; सरकार देईल. 4 लाख रुपयांची मदत

Earn Money | अतिशय कमी पैशात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिना 2 लाखापर्यंत होईल कमाई; सरकार सुद्धा करते मदत