Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खूनप्रकरणी 7 जणांना अटक

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील मंचर (Manchar) येथील सराईत गुन्हेगाराच्या गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याप्रकरणी या गुन्ह्यातील 9 आरोपींपैकी 7 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (वय, 25) याची एकलहरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सध्या 7 जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे. सात आरोपीना 7 ऑगस्ट पर्यंत घोडेगाव कोर्टाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत, बाकी 2 आरोपी फरार आहेत.

याबाबत माहिती अशी की, फरारी आरोपी संतोष जाधव याने त्याच्या सोशल मीडियावर सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो असं स्टेटस ठेवलं होतं. त्यावरून ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (Ranya Annasaheb Bankhele) याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 3 अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपुर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर रविवारी 1 ऑगस्ट रोजी भरदुपारी गोळीबार करुन हत्या (Murder) केली गेली.

दरम्यान, याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) ओंकार बाणखेले यांचा
भाऊ मयूर बाणखेले याने 2 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. यावरून,
चेतन सत्यवान गायकवाड (वय 19, रा. आनंदवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), राम सुरेश जाधव
(वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड), सौरभ कैलास पोखरकर (वय, 19, रा. मंचर), आकाश संतोष
खैरे (वय, 20, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर), लुट्या ऊर्फ तुषार नितीन मोरडे (रा. मंचर) यांच्यासह 2अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, संतोष सुनील जाधव (रा. पोखरी), पवन सुधीर थोरात (रा. मंचर) हे 2 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | ‘गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं एक गाणं येणार’ (व्हिडीओ)

Mumbai Local Train | मुंबई लोकलबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचं मोठं विधान; म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 7 arrested in Omkar Bankhele murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update