Pune Crime | पिंपरीतील धक्कादायक प्रकार ! मरणाची भीती दाखवून तब्बल 7 लाखांना गंडा

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात जादूटोणा (Black Magic) केल्याच्या कारणातून एका व्यक्तीला 7 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. आरोपी मांत्रिक महिलेनं फिर्यादी व्यक्तीला मृत्यूची भीती दाखवून वेळोवेळी विविध कारणं देत तब्बल 7 लाखाची फसवणूक (Fraud Case) केली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात (Pimpri Chinchwad Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली आहे. किमदेवांशी सोलंकी (Kimdevanshi Solankhi) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ज्योतिष महिलेचं नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी किमदेवांशी सोलंकी चिंचवड येथील उद्योगनगर परिसरातील श्रद्धा रेसीडेन्सी इमारतीतील (Shraddha Residency Building) रहिवासी आहे. याप्रकरणी प्रशांत बबनराव टेके (Prashant Babanrao Teke) यांनी फिर्याद दिली. आरोपी महिलेने फिर्यादीला आणि फिर्यादीच्या कुटुंबीयांना होणारा मानसिक त्रास कमी करण्याच्या नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. मुसलमान, पीर, फकीर, बाबा किंवा तृतीयपंथी यांच्यापैकी कोणीतरी तुमच्यावर करणी केलीय. त्यांचा प्रभाव तुमच्या कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणावर झालाय. हे दूर करण्यासाठी गुप्त आणि आघोरी पूजा करावी लागेल. अशी पूजा केली नाही तर तुमचा मृत्यूही अटळ आहे. अशी भीती घालून आरोपी महिलेनं वेळोवेळी फिर्यादीकडून 7 लाख 21 हजार 491 रुपये रोख ऑनलाइन पद्धतीने घेतले आहे. (Pune Crime)

दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे समजताच फिर्यादी प्रशांत टेके यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात (Pimpri Chinchwad Police Station) फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचं समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 च्या कलम 3 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 7 lakh looted in the name of black magic crime in pimpri chinchwad crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला दिले पेटवून; पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

 

Urfi Javed Backless Top Video | उर्फी जावेदनं फ्रंट आणि बॅक ओपन ड्रेसच्या नादात जे केलं… पाहा व्हायरल झाला व्हिडिओ

 

Lata Mangeshkar | 2 वर्षापासून गाठीभेटी टाळल्या, घराच्या बाहेरही पडल्या नाहीत, मग लतादीदींना कोरोनानं कसं गाठलं? जाणून घ्या