Pune Crime | सेवानिवृत्त सैनिकाच्या फ्लॅटमध्ये घरफोडी, बंदूक आणि 5 जिवंत काडतुसासह 7 लाखांचा ऐवज लंपास

पुणे / दिघी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त सैनिकाच्या घरात घरफोडी करु सोन्याच्या दागिन्यासह एक बंदूक (Gun) आणि पाच जिवंत काडतुसे (cartridge) असा एकूण सात लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बोपखेल (Bopkhel) येथील गणेशनगर कॉलनीत शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात (Dighi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

शिवाजी गंगाराम शिंदे (वय-56 रा. गणेशनगर कॉलनी, बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सात या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे सेवानिवृत्त सैनिक (Retired soldier) आहेत.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे व गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरुम
मधील लाकडी कपाटातून एक सिंगल बोअर बंदूक (Single bore gun), 5 जिवंत काडतुसे, रोख
रक्कम (Cash), 301 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने (Gold-silver jewelry), घड्याळ
असा एकूण 7 लाख 32 हजार 720 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास सहायक
पोलीस निरीक्षक खताळ (Assistant Police Inspector Khatal) करीत आहेत.

हे देखील वाचा

Taxpayers | टॅक्सपेयर्सला दिलासा ! इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या

Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 7 lakh stolen from burglary, gun and 5 live cartridges in retired soldier’s flat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update