Pune Crime | पुण्यात MBBS ला अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने वकिल महिलेकडून 8 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एमबीबीएसला प्रवेश (MBBS Admission) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला वकिलाने (Women Lawyer) ८ लाख रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचे समोर आले आहे. याबाबत शिवाजी पाटील Shivaji Patil (रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुग्धा ऊर्फ मिताली हेमंत कुलकर्णी Mugdha alias Mithali Hemant Kulkarni (वय २८, रा. कल्याण वेस्ट, ठाणे – Thane) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांची मुलगी बारावी पास झाली आहे. त्यांची आणि मिताली यांची गेल्या नोव्हेंबर मध्ये एका कार्यक्रमात भेट झाली. त्यात तिने आपण वकिल असून असिस्टंट जजची परीक्षा पास झाल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएसला (MBBS) अ‍ॅडमिशन घेऊन देते, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून ६ लाख २ हजार रुपये गुगल पेवरुन (G- Pay) घेतले. तसेच २ लाख रुपये रोख घेतले. अशा प्रकारे ८ लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांच्या मुलीला अ‍ॅडमिशन मिळवून न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 8 lakh fraud from a woman lawyer for admission to MBBS in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा