×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून...

Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून जखमी; नर्‍हेमधील घटना, बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : Pune Crime | पती -पत्नीच्या भांडणात दारुच्या नशेत असलेल्या पतीने झाडलेली गोळी लागून त्यांची ८ वर्षाची मुलगी जखमी झाली. ही घटना नर्‍हे येथील हेरंब हाईटसमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

राजनंदिनी पांडुरंग उभे असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) बांधकाम व्यावसायिक पांडुरंग तुकाराम उभे Pandurang Tukaram Ubhe (वय ३८, रा. हेरंब हाईटस, नर्‍हे) याला अटक केली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यातूनच त्याने परवाना असलेले रिव्हॉल्वर घेतले आहे. सध्या त्याचा व्यवसाय मंदीमध्ये असल्याने  तो आर्थिक विवंचनेत असतो. त्याला दारुचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री तो दारु पिऊन घरी आला. त्यावरुन त्याच्यामध्ये व पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पांडुरंग याने आपल्याकडील रिव्हॉल्वर काढून पत्नीवर उगारले. हे पाहून घरातच असलेली राजनंदिनी मध्ये पडली. दारुच्या नशेत असलेल्या पांडुरंगने रिव्हॉल्वरचा चाप ओढला. ती गोळी राजनंदिनीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. ती जागीच कोसळली.

गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने तेथे आले.
त्यांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेली राजनंदिनीला पाहून लगेचच भारती हॉस्पिटलला (Bharti Hospital) नेले.
तेथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. ही घटना समजताच सिंहगड रोड पोलीस तिथे पोहचले.
त्यांनी राजनंदिनी हिला चांगले उपचार मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयात हलविले असून तिची प्रकृती स्थिर
आहे. गोळीबार केल्यानंतर पांडुरंग हा घरातच होता.
पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. |सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : शिंदे फडणवीस सरकारने असा निर्णय घेतल्यास पुन्हा आंदोलन, अण्णा हजारे यांचा इशारा

BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News