Pune Crime | लोणी काळभोरच्या हद्दीतून गुटख्याच्या 150 पोत्यांसह 81 लाखाचा माल जप्त; पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

0
143
Pune Crime 81 lakh worth of goods including 150 big bags of gutkha seized from Loni Kalbhor police station area Action of Pune City Police Crime Branch
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुन्हे शाखेच्या युनिट- 6 च्या (Pune Police Crime Branch) पथकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतून तब्बल 150 पोते गुटखा (Gutkha) आणि इतर ऐवज असा एकुण 81 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे – सोलापूर रोडवरील (Pune Solapur Highway) थेऊर फाटा (Theur Phata) येथे ही कारवाई करण्यात आली असून आयशर टेम्पो चालक प्रविण दुर्योधन जाधव Pravin Duryodhan Jadhav (26, रा. मु.पो. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) याच्यावर कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 56 लाख 48 हजार 820 रूपये किंमतीचा 4000 किलो विमल गुटखा आणि वाहतूकीसाठी वापरलेला आयशर ट्रक असा एकुण 80 लाख 98 हजार 820 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या गुटखा हा बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विकला जात आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी (Food And Drug Administration Pune) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक प्रविण जाधव याच्याविरूध्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge),
सह आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate), पोलिस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle) ,
पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाण, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे,
बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे,
नितीन घाडगे, सुहास तांबेकर आणि ज्योती काळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 81 lakh worth of goods including 150 big bags of gutkha seized from Loni Kalbhor police station area Action of Pune City Police Crime Branch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा