Homeक्राईम स्टोरीPune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली...

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

विशाल दीपक गायकवाड (वय ३३, रा. पिंपळे गुरव) आणि माधवी किशोर ढेंभे ऊर्फ माधवी सुहास चव्हाण (पाटील) (वय ३०, रा. पनवेल, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण (Gaonthan, Shivaji Nagar, Pune,) येथे फिर्यादीच्या घरी १३ सप्टेबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ दरम्यान घडला.

याबाबत शिवाजीनगर गावठाण येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड याच्याशी फिर्यादी यांची ओळख होती. गायकवाड याने माधवी ढेंभे या कस्टम अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीशी ओळख करुन दिली. त्या स्वस्तात सोने खरेदी करुन देतील, असे सागून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून वेळोवेळी सोने खरेदीसाठी ७१ लाख ६० हजार रुपये रोख घेतले. तसेच अकाऊंटवरुन १२ लाख ४० हजार रुपये असे एकूण ८४ लाख रुपये घेतले. त्यांना कोणतेही सोने दिले नाही. सोने मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपले पैसे परत (Pune Crime) मागितले. परंतु, त्यांनी पैसेही न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 84 lakh cheating in the name of giving cheap gold by pretending to be a customs officer; Incident in Shivajinagar gaonthan of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ginger Tea | जर तुम्ही सुद्धा हिवाळ्यात पित असाल आल्याचा चहा तर व्हा सावध, ‘या’ गंभीर आजारांना बळी पडू शकता!

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

Rakhi Sawant | काय सांगता ! होय, राखी सावंतची विराट कोहली अन् अनुष्का शर्माला कंडोम गिफ्ट करण्याची इच्छा; कारण जाणून व्हाल हैराण

Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख

Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News