Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार शिवराज शिंदे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 86 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 86 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार शिवराज शंकर शिंदे Shivraj Shankar Shinde (वय – 34) व त्याच्या टोळीतील 3 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 86 आणि चालु वर्षात 23 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

टोळी प्रमुख शिवराज शंकर शिंदे (वय – 34 रा. उपळाई रोड, बार्शी, सोलापुर, सध्या रा. नऱ्हे), मनोज बाळु चांदणे Manoj Balu Chandne (वय – 23 रा. पानमळा, पुणे), निखील अरुण इंगळे Nikhil Arun Ingle (वय – 23 रा. कॉसमॉस बँकेसमोर, पानमळा), संजय बाळु चव्हाण Sanjay Balu Chavan (वय – 21 रा. धायरी फाटा, नवले शाळेशेजारी, धायरी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केली आहे.

 

शिवराज शिंदे व त्याच्या साथीदारांनी सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा म्हणून शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच या टोळीवर मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे (Attempted Murder), कोयता आणि घातक शस्त्र जवळ बाळगून दंगा करण्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. (Pune Crime)

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe) यांनी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड,
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस अंमलदार कामतकर, स्मित चव्हाण, महिला पोलीस अंमलदार महाडीक यांनी केली.

 

आयुक्तांची 86 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 86 तर चालु वर्षात 23 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 86th MCOCA action taken by Commissioner Amitabh Gupta against Pune Criminals gangs and criminals till date

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा