Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पाईपलाईनचे टेंडरच्या (PMC Pipeline Tender) कामासाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन त्यावरुन ९ लाख रुपयांचे कर्ज (Loan) मंजूर करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अविनाश रत्नाकर बकाल (वय ३२, रा. रविवार पेठ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय धाये, जय शंकर चौधरी, गौरव रणवीर सूर्यवंशी (रा. रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एच डी एफ सी बँकेच्या बंडगार्डन रोडवर १५ सप्टेबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बकाल यांनी जय चौधरी यांच्या सांगण्यावरुन गौरव सूर्यवंशी याच्याकडे महापालिकेच्या पाईपलाईनचे टेंडरच्या कामासाठी कागदपत्रे दिली.
या कागदपत्राच्या आधारे फिर्यादी यांना कॅपिटा इंडिया प्रा. लि. कंपनीत नोकरी असल्याचे भासविले.
ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून एच डी एफ सी शाखेत दिली.
फिर्यादीचे बनावट सह्या करुन फिर्यादीचे नावावर ९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन ती रक्कम आरोपींनी त्यांच्या
खात्यावर पाठविण्यास भाग पाडून फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 9 lakh loan taken out by misusing the documents given for the tender of Pune Municipal Corporation PMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ ठाकरे सरकार पडल्यानंतर फडणवीसांचे जुने ट्विट व्हायरल

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

 

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला