Pune Crime | कोंढव्यात 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | छुप्या पद्धतीने तंबाखुजन्य पान व गुटखा मसाल्याचा अमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) पर्दाफाश केला आहे. कोंढवा परिसरात येवलेवाडी खडीमशीन चौकात पथकाने छापा टाकून 9 लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ (Pune Crime) जप्त केले. याप्रकरणी सिराज नुरआलम मनसुरी Siraj Noor Alam Ansari (वय-२९ रा कोंढवा) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) परिसरात पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी येवलेवाडी ते खडी मशिन चौकात टेम्पोतुन तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने टेम्पो चालक सिराज नुरआलम मनसुरी याला ताब्यात घेतले. प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य पान मसाला व गुटख्याची पोती, तंबाखूजन्य पान मसाला व गुटखा, टेम्पो जप्त करण्यात आला. (Pune Crime)

 

चौकशीत त्याने बोपगाव, (ता. पुरंदर) मधील गोडाऊनमध्ये अणखीन तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती दिली. पथकाने गोडाऊनमध्ये छापा टाकून आणखीन 5 लाखांचा तंबाखुजन्य पदार्थ, पान मसाला व गुटखा जप्त केला. आरोपीकडून १४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte),
उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan),
उपनिरीक्षक एस. डी. नरके (PSI S. D. Narke),
संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड,
शेख, शेळके, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, युवराज कांबळे,दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली

 

Web Title :- Pune Crime | 9 lakhs worth of tobacco stock seized by Crime Branch in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा