Pune Crime | मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात, 9 विद्यार्थी जखमी; उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) शाळेत घेऊन येणार्‍या एका विद्यार्थी रिक्षाचा सोमवारी सकाळी अपघात (School Rickshaw Accident In Pune) होऊन त्यात रिक्षामधील ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत (Pune Accident). ही सर्व मुले बोरीभडक (Boribhadak) गावात राहणारी आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली आहे. (Pune Crime)

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी सांगितले की, उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थीना घेऊन रिक्षाचालक निघाला होता. बोरीभडक गावातील ७ मुली व २ मुले यांना रिक्षाचालकाने रिक्षात घेतले होते (Pune Crime). सोलापूर रोडवरुन (Pune-Solapur Highway Accident) जात असताना रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले व रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झाडीत जाऊन धडकली. त्यात रिक्षामधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली असून सर्वांवर उरळीकांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Web Title : Pune Crime | 9 students injured in rickshaw accident Incident in
Boribhadak village near Uruli Kanchan pune solapur highway accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून