Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून 14 वर्षाच्या मुलीला मामे भावाने केले गर्भवती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरी आलेल्या मामे भावाने लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape in Pune) करुन तिला गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी गुलटेकडी येथील इंदिरानगरमध्ये (Indira Nagar, Gultekdi) राहणार्‍या एका १४ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या २० वर्षाच्या मामेभावाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही घरी असताना तिचा मामे भावाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. १५ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर हा मामेभाऊ गुजरातला निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांना उलट्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी व सोनाग्राफी (Sonography) केली असता त्या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 14-year-old girl was made pregnant by her cousin on the pretext of marriage; FIR in Swargate Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने गुंडाने तरुणासह आई, पत्नी, भावाला केली बेदम मारहाण; येरवड्यातील घटना

 

Rupali Chakankar | किरण मानेंना मालिकेतून का काढले? खुलासा करावा; रुपाली चाकणकरांचे निर्मात्यांना पत्र

 

Nana Patole | ‘माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

 

Coronavirus in Maharashtra | रुग्णसंख्येत मोठी घट! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 31,111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी