Pune Crime | पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती 27 वर्षीय महिला, बाळू शिळीमकर म्हणाला – ‘नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तो माझ्यासोबत कर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune Crime) महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. पुण्यातील (Pune Crime) लक्ष्मी रोडवरील (Laxmi Road ) एका प्रसिद्ध कापड दुकानात (cloth shop) काम (Job) मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

बाळु शिळीमकर Balu Shilimkar (वय-45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन (Deccan) परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कापड दुकानाबाहेर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकात (Kunte Chowk) ‘तनिषा क्रिएशन’ (Tanisha Creation) नावाचे कापड दुकान आहे.
फिर्यादी महिला कापड दुकानात कामाबाबत चौकशी करण्यासाठी गेली होती.
त्यावेळी बाळु शिळीमकरने पीडित महिलेला दुकानाबाहेर नेऊन पार्ट टाईम काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
काम मिळवून देण्यासाठी ‘तू नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तसाच माझ्यासोबत कर’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली.
पीडित महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | a 27-year-old woman who had gone to a shop on Laxmi Road in Pune to ask for a job, Balu Shilimkar said – Do with me what she does with her husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सैन्य भरतीत बनावट जन्मदाखला देऊन बॉम्बे इंजिनियरिंगची फसवणूक; पुण्याच्या विश्रांतवाडीमधील घटना

Satara News | साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

e-Shram पोर्टलला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद ! आतापर्यंत 1 कोटी कामगारांनी केले रजिस्ट्रेशन; 38 कोटी कामगारांना होईल फायदा