Pune Crime | पुण्यात 28 वर्षीय महिला वकिल, त्यांच्या पतीवर कोयत्याने सपासप वार; भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

0
273
today's bharti vidyapeeth police station News , nashik bharti vidyapeeth police station latest news, bharti vidyapeeth police station latest news today, latest bharti vidyapeeth police station News, bharti vidyapeeth police station marathi news, bharti vidyapeeth police station News today marathi, marathi bharti vidyapeeth police station News , latest news on bharti vidyapeeth police station , latest marathi bharti vidyapeeth police station News ,
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पतीबरोबर कारमधून जेवणासाठी जात असलेल्या वकील महिलेसह तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार आंबेगाव बुद्रुक (ambegaon budruk) येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police station) तडीपार गुंडासह तिघांना अटक (Pune Crime) केली आहे.

सराईत गुंड रितेश विजय कोंढरे Riteish Vijay Kondhre (वय २३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), ओंकार सुरेश तांबे omkar suresh tambe (वय २८, रा. पदमावती),
निलेश श्रीमंत थोरात nilesh shreemant thorat (वय २०, रा. पदमावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अ‍ॅड. त्रिवेणी अतुल रुपटक्के Adv. Triveni Atul Rupatakke (वय २८, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी (गु. र. नं. ६७६/२१) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी ३०७, ५०४, ५०६, ४२७, ३४ सह आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणी रुपटक्के या आपले पतीसह ३ ऑक्टोंबरला रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला रितेश कोंढरे याची कार घासून गेली.
त्यावेळी अतुल यांनी त्यांची कार कोंढरे यांच्या कारच्या मागे घेतली. पुढे जाऊन ही कार आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मित्र मंडळ येथे थांबली.
अतुल रुपटक्के यांनी जाब विचारला असता रितेश याने गाडी येवठी घासली म्हणून काय झाले म्हणत तुला माहिती आहे का मी कोण आहे, अशी धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी रितेश व त्याच्या दोन साथीदारांनी कारमधून कोयता काढून अतुल यांच्यावर उगारला.
त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी या मध्ये पडल्या असताना कोयता त्यांच्या हाताला लागून त्या जखमी (Pune Crime) झाल्या.
तिघांनी दोघांना लाकडी बॅटने मारहाण करुन तुमची विकेट टाकू अशी धमकी दिली.
रितेश कोंढरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavthekar) अधिक तपास करीत आहेत.

 

पोलिस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (senior police inspector jagannath kalaskar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव (Police Inspector Sangeeta Yadhav), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), उपनिरीक्षक अंकुश कर्चे (PSI Ankush Karche), तपास पथकातील अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गुणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर आणि शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

 

Web Title : Pune Crime | A 28-year-old woman lawyer and her husband stabbed in Pune; Bharti vidyapeeth police arrest three

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Yavatmal Crime | खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर