Pune Crime | पुण्यात कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पदाचा फायदा घेत 31 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा फायदा घेऊन तरुणीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात (Love Affair) ओढले. पत्नीला घटस्फोट (Divorce) देऊन तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका तरुणीवर वारंवार शारिरीक अत्याचार करत बलात्कार (Rape In Pune) केला. साथीदाराच्या मदतीने कंपनीत बदनामी (Defamation) केली. तसेच पोलिसांमध्ये (Pune Police) तक्रार केल्यास तुझ्या घरच्यांचा अपघात घडवून आणेल अशी धमकी (Threat) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) राहुलकुमार सिंग Rahul Kumar Singh (वय ३७, रा. खराडी) आणि मालव आचार्य Malav Acharya (वय ३०, रा. अहमदाबाद – Ahmedabad ) यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime)दाखल केला आहे.

 

याप्रकरणी अहमदाबाद येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मांजरी (Manjari), खराडी (Kharadi), पुणे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून ते ११ जून २०२१ दरम्यान घडली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पुण्यातील कंपनीत कामाला असताना राहुलकुमार हे तिचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी पदाचा फायदा घेऊन फिर्यादीसोबत फोनवर संपर्क वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी हिला वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार नेऊन शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले.

फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा मालव आचार्य याच्या मदतीने तिचे राहते ठिकाणी तसेच कंपनीमध्ये तिची बदनामी केली.
फिर्यादीचा मानसिक छळ (Mental Torture) करुन तिला पुण्यातील राहते घर सोडायला लावून अहमदाबादला परत जाण्यास भाग पाडले.
तू पोलिसांकडे तक्रार (Police Complaint) दिली तर तुझ्यावर रेप करायला लावील,
तुझ्या घरच्यांचा अपघात करील आणि कोणी केला ते पण समजणार नाही,
अशी धमकी देऊन फिर्यादी यांना धक्काबुक्की केली,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 31 year old girl was sexually assaulted by a senior company official in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा