Pune Crime | पुण्याच्या वडगाव शेरीत 32 वर्षीय महिलेशी अश्लील भाषा तर खडकीत 29 वर्षीय तरूणीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भररस्त्यात पायी जाणार्‍या महिलांना धक्का देऊन त्यांना शुक शुक करणे, अचानक त्यांच्या कंबरेला हात घालून लज्जास्पद (Shameful) वर्तन करण्याचे प्रकार पुणे शहरात (Pune Crime) सर्रास होऊ लागले आहेत. त्यापैकी काही महिला, तरुणी पुढे येऊन तक्रार (FIR) करीत असून अनेक जणी सर्वांसमोर होणारा हा प्रकार मुकाट्याने सहन करताना दिसून येत आहे.

 

याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) वडगाव शेरीत (Wadgaon Sheri) राहणार्‍या एका 32 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद पांडुरंग दामोदरे Pramod Pandurang Damodare (वय 38, रा. वडगाव शेरी) याला अटक (Arrest) केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रविवारी (दि.13) सायंकाळी भाजी आणण्यासाठी पायी जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आला व त्यांना पाठीमागून धक्का देऊन निघून गेला. भाजी घेऊन फिर्यादी या परत घरी जात असताना त्याने फिर्यादीकडे पाहून शुक शुक असा आवाज दिला. तुला लायसन्स (License) पाहिजे असेल तर पुढार्‍यांकडे जायचे त्यांच्याकडे रात्रभर…, त्यानंतर लगेच लायसन्स भेटते, असे म्हणून त्यांचा भर रस्त्यात विनयभंग (Molestation Case) केला.

 

 

दुसरी घटना खडकीतील मुळा रोडवरील दुर्गा माता मंदिराजवळ (Durga Mata Temple Khadki) शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
याप्रकरणी एका 29 वर्षाच्या तरुणीने खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिासंनी राहुल धरमपाल यादव (Rahul Dharampal Yadav)
व सचिन धरमपाल यादव Sachin Dharampal Yadav (रा. खडकी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
फिर्यादी या पायी घरी जात असताना त्यांच्या येथे राहणार्‍या राहुल यादव हा अचानक समोरुन आला
व त्याने फिर्यादीच्या कंबरेत हात घालून लज्जास्पद वर्तन केले.
फिर्यादी यांनी त्याला जाब विचारल्यावर त्यांनी चिडून जाऊन फिर्यादीच्या घरी येऊन
शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे (API Kendre) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 32-year-old woman was sexually assaulted in Pune’s Wadgaon Sheri while a 29-year-old girl was molested in Khadki

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा