Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 48 वर्षाच्या नराधमाला अटक

पुणे : Pune Crime | येरवड्यातील (Yerwada) वस्तीत शेजारी राहणार्‍या ३ वर्षाच्या मुलीला घरात घेऊन लाइट बंद करुन तिच्याबरोबर लैंगिक गैरवर्तन (Sexual Abuse) करणार्‍या एका ४८ वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४६३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीच्या वस्तीत राहणार्‍या एका ४८ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच वस्तीत राहायला आहेत.
फिर्यादी यांची ३ वर्षाची मुलगी शेजारी राहणार्‍या मामीकडे जात असताना घराशेजारी राहणार्‍या आरोपीने फिर्यादीच्या मुलीला घरात ओढून लाईट व दरवाजा बंद केला.
तिच्या अंगावर हात फिरवून तिच्या गालाची व ओठाची पप्पी घेऊन तिच्याबरोबर लैंगिक गैरवर्तन केले.
पोलीस उपनिरीक्षक गाताडे (Sub-Inspector of Police Gatade) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A 48-year-old who sexually assaulted a three-year-old girl was arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

Pimpri Pune Crime | पत्नीचा खून करून पतीची गळफास घेत आत्महत्या, भोसरी परिसरातील घटना

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे