Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये सावकारी, खंडणी उकळल्याप्रकरणी सागर राजपूतसह 11 जणांविरूध्द गुन्हा, सदाशिव पेठेतील 53 वर्षीय व्यक्तीनं केली तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | साडेपाच लाख रुपये हात उसने घेतले असताना त्यावर पठाणी व्याजाने तब्बल २५ लाख रुपयांची वसुली केली. तरीही अजून ८५ लाख रुपये ऐवढी मुद्दल झाल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने जागा नावावर करुन घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी कोथरुड (Kothrud Police) पोलिसांनी ११ जणांवर खंडणी तसेच सावकारीविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सागर कल्याण रजपूत (Sagar Kalyan Rajput), जिग्नेशा सागर रजपूत (Jignesha Sagar Rajput), प्रभावती कल्याण रजपूत (Prabhavati Kalyan Rajput) (रा. पौड रोड, कोथरुड – (Paud Road, Kothrud) राणी मारणे Rani Marne (रा. कोथरुड), अमित काळे, भुड्या आणि इतर ५ ते ६ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २०१८ ते २२ जुलै २०२१ दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी सदाशिव पेठेतील ५३ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी त्यांचा मित्र अमित उणेचा यास जिग्नेशा सागर रजपूत याच्याकडून ७ लाख रुपये मिळाले होते.
फिर्यादी याने साडेपाच लाख रुपये व्याजाने घेतले होते.
या रक्कमेवर व्याजापोटी फिर्यादीकडून रोख, फोन पे व बँक खात्याद्वारे बळजबरीने २५ लाख रुपये एवढी रक्कम बळजबरीने घेतली.
असे असतानाही या रक्कमेचे व्याज व दंड असे मुद्दलात जमा करुन ८५ लाख रुपये एवढी मुद्दल झाल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले.
जिग्नेशा रजपूत, आणि प्रभावती रजपूत यांनी जीवे ठार मागण्याची धमकी दिली.
मुद्दल रक्कमेपोटी त्यांच्या मालकीची सिंहगड कॉलेजजवळील आंबेगाव येथील १७२० स्क्वेअर फुट बांधकाम असलेली मिळकतीचे जबरदस्तीने रजिस्टर्ड कुलमुख्यत्यारपत्र, नोटराईज्ड करारनामा व प्रतिज्ञापत्र करुन घेतले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तसेच त्यांचा मित्र अमित उणेसा याच्याकडून देखील ७ लाख रुपये रक्कमेच्या बदल्यात त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्याच्या घरी हत्यारासह स्वत:च्या टोळीतील ७ ते ८ गुंड पाठवून अमित याच्याकडून मोठ्या प्रमाणावर बळजबरीने रक्कम घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके (Sub-Inspector of Police Shelke) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | A 53-year-old man from Sadashiv Peth has lodged a complaint against 11 persons including Sagar Rajput for lending money in Kothrud, Pune.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | प्रेमप्रकरणातून 17 वर्षीय मुलाचं गुप्तांग कापूण केलं ठार; प्रियसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime | जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; प्रचंड खळबळ