Pune Crime | बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु

पुणे : Pune Crime | वाघोली (Wagholi, Pune) येथे बांधकाम (Construction) करण्यासाठी खणलेल्या मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका ७ वर्षाच्या मुलाचा बुडुन मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)

कुमार स्वराज Kumar Swaraj (वय ७) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन भास्कर काळे Sachin Bhaskar Kale (वय ३८, रा. कमल बाग सोसायटी, सँग्रीला हॉटेलजवळ, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल अशोक संदलसे Amol Ashok Sandalse (वय ३३), पुजा अमोल संदलसे Puja Amol Sandalse (वय २८), सचिन अशोक संदलसे Sachin Ashok Sandalse (वय ३१, सर्व रा. वडगाव शेरी) आणि चंद्रकांत मातंगी Chandrakant Matangi (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १२ सप्टेबर रोजी दुपारी साडेचार वाजता वाघोली येथील बांधकामाच्या साईटवर घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी आरोपींनी बांधकाम करण्यासाठी मोठा
खड्डा खणून ठेवला आहे. त्यात पावसामुळे पाणी साचले होते. या खड्ड्याभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही
उपाय योजना केली नव्हती. फिर्यादी यांचा पुतण्या कुमार स्वराज हा या खड्ड्यातील पाण्यात पडल्याने त्याचा बुडुन मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक टापरे (Assistant Police Inspector Tapre) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A 7-year-old boy died after falling into the water in the construction pit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | अजित पवारांना मुख्यमंत्री करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना ‘ऑफर’