Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud
file photo

पुणे : Pune Crime | एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास मदत करण्याचा बहाणा करुन कार्ड (ATM Card) बदली करुन चोरट्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime)

याप्रकरणी कोथरुडमध्ये (Kothrud) राहणार्‍या एका ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारतीय सैन्य दलातून २००६ मध्ये निवृत्त झाले आहेत. ते २७ ऑगस्ट रोजी दुपारी पौड रोडवरील आनंदनगर (Anand Nagar, Paud Raod, Pune) येथील एस बी आय बँकेच्या (SBI Bank ATM Center) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते पैसे काढत असताना तोंडावर मास्क घातलेला एका तरुण आत आला व त्याने साहेब मी तुम्हाला पैसे काढण्यास मदत करतो.

तुमचा एटीएम कार्ड माझ्याकडे द्या, असे बोलून त्याने त्यांच्याकडील कॅनरा बँकचे (Canara Bank) एटीएम कार्ड
घेतले (Pune Crime). त्यांना पीन नंबर विचारला. त्यानंतर साहेब तुमचा एटी एम कार्ड डिक्लाइन म्हणून येत
आहे. नेटवर्क प्राब्लेम आहे, तुम्ही नंतर येऊन पैसे काढा, असे सांगत त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये ठेवून निघून
गेला. फिर्यादी यांनी मशीनमधील कार्ड काढून पाहिले तर त्यांच्या कॅनरा बँकेच्या कार्डाऐवजी त्यात एस बी आयचे
कार्ड होते. त्यांनी बाहेर येऊन त्याचा शोध घेतला असता़ तो मिळून आला नाही. त्यानंतर दहा मिनिटांनी त्यांच्या
खात्यातून ३ वेळा १० हजार रुपये व ५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला.
कोथरुड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Pune Accident News | चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यु

 

Total
0
Shares
Related Posts
Pune Lohegaon Airport | State-of-the-art Bag Inspection Machine commissioned at Pune Airport; Passengers will be relieved by reducing the waiting time for inspection; Inspection of about 1100 to 1200 bags in an hour

Pune Lohegaon Airport | पुणे विमानतळावर अत्याधुनिक बॅग तपासणी मशीन कार्यान्वित; तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार; एका तासात सुमारे 1100 ते 1200 बॅगांची तपासणी