×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) 60 ते 70 कार्यकर्त्यांवर...

Pune Crime | पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | सक्त वसुली अंमलबजावणी (ED), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यासह देशभरात PFI च्या कार्यालये (Popular Front Of India), सदस्यांवर घातलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर (Pune Collector Office) आंदोलन करण्यात आले. त्यांच्यावर बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

रियाजजैनुद्दीन सय्यद (वय २६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) व इतर ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

एन आय ए, ईडी व एटीएस यांच्याकडून देशभरात पॉप्युलर फ्रंट  ऑफ इंडिया या संघटनेच्या १५ राज्यातील ९३ ठिकाणी छापे घातले. १०६ जणांना गुुरुवारी अटक केली आहे. एनआयएची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे ६० ते ७० कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटसमोर तसेच बोल्हाई चौकात जमले. त्यांनी तेथील रस्ता अडविला.
राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मोठ मोठ्याने अर्वाच्य घोषणा देऊन वाहनांना अडथळा निर्माण केला.
तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been registered against 60 to 70 workers of Popular Front of India (PFI) in Pune for gathering an illegal crowd.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shahid Afridi | होय, मी चीटिंग केली होती ! ‘त्या’ सामन्याबाबत शाहिद आफ्रिदीचा मोठा खुलासा

Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून जखमी; नर्‍हेमधील घटना, बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात

Rohit Sharma World Record | हिटमॅन रोहितने नागपूर T-20 मध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News