Pune Crime | 1 कोटींची फसवणूक करणार्‍या पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमिनीच्या केसमध्ये कोर्टामध्ये आवश्यक तडजोड करण्यासाठी १५ लाख रुपये घेऊन कोर्टात केस योग्यरित्या न लढविताना फिर्यादीची जमीन (Land) विक्री करुन त्याची रक्कम न देता १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा दाखल केला आहे. आशिलाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

अ‍ॅड. सतीश गजानन मुळीक Adv Satish Gajanan Mulik (रा. वडगाव शेरी – Wadgaon Sheri) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत चंद्रशेखर राजेंद्र गलांडे Chandrasekhar Rajendra Galande (वय ४०, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२७/२२) दिली आहे. हा प्रकार डिसेबर २०१२ पासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश मुळीक हे वकिल आहेत.
फिर्यादी यांचे जमिनीच्या केसबाबत कोर्टामध्ये आवश्यक तडजोड करण्यासाठी सुमारे १५ लाख रुपये मुळीक यांनी घेतले होते.
त्यांचे केसबाबत कोर्टामध्ये योग्य रितीने काम केले नाही.
फिर्यादी यांच्याकडून ६.१७ गुंठे वडिलोपार्जित जमीन ३० लाख रुपये प्रति गुंठा दराने विकत घेतली.
ती ब्रम्हा बिल्डर Brahma Builder यांचे नावे खरेदीखत केले. त्या पोटी येणार्‍या रक्कमेपैकी सुमारे ८६ लाख ४५ हजार रुपये त्यांनी फिर्यादी यांना दिले नाही. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे वारंवार मागणी करुनही त्यांनी ही रक्कम दिली नाही. त्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या suicide करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर १ कोटी १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक Fraud केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड Sub-Inspector of Police Gaikwad तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | A case has been registered against a well known lawyer in Pune who cheated 1 crore

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा