Pune Crime | पुण्यात राज्यपालाविरुद्ध आंदोलन करणार्‍या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी (NCP Office Bearers ) परवानगी न घेता २८ फेब्रुवारी महापालिकेच्या (Pune Corporation) जुन्या इमारतीच्या (PMC Old Building) पायर्‍यावर आंदोलन केले होते. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

यानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap),
प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), महेश हांडे, दीपाली धुमाळ (NCP Dipali Dhumal),
मृणाली वाणी, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, विक्रम जाधव, बाळासाहेब बोडके, योगेश ससाणे, सुनिल बनकर,
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० महिला, पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारची पोलीस विभागाची व इतर विभागाची पूर्व परवानगी न घेता़ पुणे मनपा कार्यालयात त्यांना आत जाण्यास रोखले असताना त्यांनी न ऐकता गैरकायद्याची मंडळी जमविली.
मनपाचे जुन्या इमारतीच्या पायर्‍यावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करुन आंदोलन केले,
म्हणून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद एका पोलीस (Pune Police) शिपायाने दिली आहे.

पुणे मनपा ही वास्तू पुणे मनपाच्या अखत्यारित असल्यामुळे पुणे मनपा कार्यालयातील संबंधीत अधिकार्‍यांनी तक्रार द्यावी की पोलीस विभागाने तक्रार द्यावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
महापालिका अधिकार्‍यांनी तक्रार देणे अपेक्षित होते.
त्यांनी तक्रार न दिल्याने शेवटी सर्व गोष्टींची शहानिशा करुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against NCP office bearers protesting against the Governor Bhagat Singh Koshyari in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा