Pune Crime | पतीच्या मृत्युनंतर जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करुन पेन्शन घेणार्‍या पत्नीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर बॅकिंगमधील (College of Agriculture Banking) सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा मृत्यु (Death) झाला असतानाही ते जीवंत असल्याचे प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करुन पेन्शन घेतल्याबद्दल पत्नीविरुद्ध फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पत्नीचे निधन झाल्यानंतर आता दीड वर्षाने हा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime)

 

राजी पदमनाभन (Raji Padmanabhan) (रा. वडाळा, मुंबई – Wadala Mumbai) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर बँकिंगचे सहायक महाव्यवस्थापक अंजली कार्येकर (Anjali Karyekar) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८५/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. पी पदमनाभन (K. P Padmanabhan) हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे कर्मचारी होते.
ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्त वेतन मिळत होते. त्यांचे १४ जून २०१८ रोजी निधन झाले.
त्यानंतरही त्यांच्या पत्नी राजी पदमनाभन यांनी बँकेला के. पी पदमनाभन हे जीवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले.
त्यामुळे बँकेकडून त्यांना पेन्शन (Pension) दिली जात होती.
दरम्यान २१ डिसेंबर २०२० रोजी राजी पदमनाभन यांचेही निधन झाले. त्यानंतरही जानेवारी २०२१ पर्यंत पेन्शन सुरु होती. त्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे. या पेन्शनचा लाभ नक्की कोण घेत होते. नेमकी फसवणुक (Fraud) कोणी केली, याचा तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) हे करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | A case has been registered in Chaturshringi police station against the wife who got pension by submitting death certificate of her husband

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा