Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक महेश थोरात व शिरीष लोढा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांधलेल्या इमारतीची मजुरी व जीएसटी न देता एका बिल्डरची दीड कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी दोन बिल्डरवर (Builder) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) 15 मे 2017 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत मांजरी बु. येथील अथर्वसृष्टी (Atharva Shrishti) येथे घडला आहे.

 

अथर्व बिल्डकॉनचे (Atharva Buildcon) बिल्डर महेश एकनाथ थोरात Mahesh Eknath Thorat (वय 41 रा. मांजरी खु), शिरीष निहालचंद लोढा Shirish Nihalchand Lodha (वय 39, रा. गुलटेकडी, पुणे) यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आयपीसी 420, 406, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण शिवाजी कुसाळकर Pravin Shivaji Kusalkar (वय 44, रा. सातवसाहेब वाडाजवळ, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, आरोपी महेश थोरात त्यांच्या ओळखीचे आहेत. महेश थोरात यांनी फिर्यादी यांना अथर्वसृष्टी येथील इमारत बांधण्याचे काम दिले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी इमारतीचे काम केले. कामाचे पैसे मागण्यासाठी फिर्य़ादी हे थोरात यांच्याकडे गेले असता, त्यांनी पैसे देतो असे सांगितले. मात्र, त्याच दिवशी थोरात यांनी गुन्हे शाखा युनिट सहाकडे (Crime Branch Unit-6) फिर्यादी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली.
त्यानंतर त्यांच्यामध्ये समजुतीचा करारनामा (MOU) झाला.
त्यानुसार आरोपींनी एक महिन्याच्या आत फिर्यादी यांना 1 कोटी 53 लाख रुपये कामाची मजुरी व जीएसटीची रक्कम द्यायची होती.
परंतु आरोपींनी फिर्य़ादी यांचे पैसे न देता जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill)
देऊन खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा