Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार

पुणे/नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मच्छिंद्र लक्ष्मण मडके (रा. तांबे, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी (Pune Crime) दिली. वारुळवाडी येथील टोमॅटो मार्केट येथे आरोपीने वीनस ट्रेडिंग ग्रुप नावाचे शेअर मार्केटिंग ग्रुप ही खासगी कंपनी सुरू केली होती.

 

फिर्यादी यांनी आरोपी मडके याला टप्प्याटप्प्याने आरटीजीएसद्वारे 34 लाख 50 हजार रुपये दिले होते. दरम्यान, फिर्यादी यांनी मडके याला फोन करून परताव्याबाबत विचारणा केली असता त्याने शेअर मार्केट तेजीत आहे, पैसे वढतील असे सांगितले. मडके याने डिसेंबर 2021 ते मे 2022 या कालावधीत 6 लाख 11 हजार रुपयांचा परतावा फिर्यादी यांना दिला. (Pune Crime)

 

यानंतर आरोपीने फोन घेण्यास टाळाटाळ करणे, उडवाउडवीची उत्तरे देणे असा प्रकार फिर्यादी यांच्यासोबत होऊ लागला.
त्यामुळे फिर्यादी यांनी नारायणगाव येथे जाऊन माहिती घेतली असता, आरोपीने अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर मिळणाऱ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले. मडके याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a case of fraud worth crores to narayangaon pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात