Pune Crime | न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल; प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून

पुणे : Pune Crime | बांधकामाच्या साईटवरील पाण्याच्या टाकीत एक २३ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाच्या आईने न्यायालयात (Pune Shivajinagar Court) धाव घेतली. त्यानंतर आता तब्बल पावणे दोन वर्षानी खूनाचा (Murder In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

निरंजन महादेव काटकर (वय २३, रा. सुंदरबन सोसायटी, फुरसुंगी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अरुणा महादेव काटकर (वय ४२, रा. सुंदरबन सोसायटी, फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बिभीषण माने, संजय हरिचंद्र माने, सचिन दगडु खोचरे, हनुमंत अंकुश कलढाणे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील स्वराज पार्क येथील बांधकामाच्या साईटवरील पाण्याचे टाकीमध्ये ३ एप्रिल २०२१ रोजी रात्री अकरा ते ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरंजन काटकर याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यु झाल्याचे
आढळून आले होते. शवविच्छेदनात डॉक्टरांनी पाण्यात बुडुन मृत्यु असा अहवाल दिला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. निरंजन याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते.
त्यावरुनच आरोपींनी त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केला, असा त्याच्या आईला संशय होता.
त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हंबीर (PSI Hambir) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case of murder was registered in Loni Kalbhor police station after taking notice of the court; Murder of young man on suspicion of love affair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स