Pune Crime | पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकावर (API) बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) देऊन तुला नांदायला घेऊन जातो, असे सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना सांगवीत (Sangvi News) उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस (Satara Police) दलात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर (Assistant Police Inspector) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi ) बलात्काराचा (Rape) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी बबन भोसले (Shivaji Baban Bhosle) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. शिवाजी भोसले हे सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष (Police Headquarters Control Room) येथे कार्यरत आहेत. याप्रकरणी एका पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 16 जून 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथील शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी भोसले यांनी फिर्यादी महिलेसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला.
पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुला नादायला नेतो असे फिर्यादी महिलेला सांगितले.
मात्र, भोसले यांनी महिलेला नांदायला घरी घेऊन न जाता वारंवार खोटे बोलून महिलेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Physical harassment) केले.
तसेच महिलेला शिवीगाळ करुन बदनामी करण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहेत.

Web Title : Pune Crime | A case of rape has been registered against an Assistant Police Inspector (API) in Pune

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर