Pune Crime | बँकेत बॅलन्स नसताना दिला अडीच कोटीचा धनादेश; फसवणूक केल्या प्रकरणी एकावर FIR

पुणे / हिंजवडी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | कंपनीतील भागीदारी स्वत: विकत घेतो असे सांगून बँकेत बॅलन्स नसताना अडीच कोटी रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत (Hinjawadi Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 19 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये बी हाईव्ह रेस्टॉरंट अँड बार हिंजवडी (BeHive Restaurant & Bar Hinjewadi) येथे घडला.

अनंत रामचंद्र काळकुटे Anant Ramchandra Kalakute (वय- 52 रा. बी-9, निकाश स्काईज, सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळकुटे यांच्या फीर्यादीवरुन पोलिसांनी पराग राकेश आनंद Parag Rakesh Anand (रा. 11/9 अतुल पार्क, मंगलदास नायलोरे रोड, कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराम हॉस्पिटॅलिटी एल.एल.पी (Sairam Hospitality L.L.P.) तर्फे अनंत काळकुटे यांना आरोपी आनंद याने त्यांच्या बी हाईव्ह रेस्टॉरंट अँड बार हिंजवडी येथील हॉटेल व्यवसायात त्यांना व त्यांच्या मित्रांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले. त्यांच्यासोबत भागीदार करारनामा केला. हॉटेल व्यवसाय (Hotel business) चालत नसल्याने फिर्यादी यांनी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आरोपी पराग आनंद याने कंपनीची भागीदारी स्वत: विकत घेतो असे सांगून अडीच कोटी रुपयांचा चेक दिला. बँकेत बॅलन्स नसल्याने धनादेश वटला नाही.
आरोपीने जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने बँकेत बॅलन्स नसताना अडीच कोटी रुपयांचा धनादेश दिली.
तसेच तसा करारनामा करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | A check of Rs. 2.5 crore given when there is no balance in the bank; FIR against one in fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad Corporation | महापालिकेची महासभा सत्ताधारी भाजपाने रेटली, 10 मिनिटांत 22 विषय मंजूर करत गुंडाळले कामकाज

Pune Crime | धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात आत्महत्या, परिसरात खळबळ

Booster Dose Planning | महाराष्ट्रात कधी दिले जाणार बूस्टर डोस? अजित पवार म्हणाले…