Pune Crime | निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाचे धक्कादायक कृत्य, तरुणीचे न्यूड फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॉलेजमध्ये शिकत असताना ओळख झालेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) झाले. मात्र, पुण्यात आल्यानंतर तरुणीने प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाने भयंकर कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो (Nude Photos), अश्लील व्हिडिओ (Porn Videos) सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर (Porn Site) अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी अमेय अनिल दबडे Amey Anil Dabde (रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.(Pune Crime)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अमेय दबडे हे कोकणातील (Konkan) एका कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर तरुणीने अमेय सोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. यनंतर आरोपीने तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तरुणीने नकार दिला.

अमेय याला या तरुणीच्या सोशल मीडियावरील (Social Media) इन्स्टाग्रामचा (Instagram)
आयडी व पासवर्ड माहित होता. त्याने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर तिचे न्यूड फोटो पाठवले.
तसेच त्याने तिच्या नावाने बनावट पॉर्नसाईटवर खाते तयार केले. त्यावर तिचे न्यूड फोटो व अश्लिल व्हिडिओ
अपलोड केले. तसेच तिचा फोन नंबर पॉर्नसाईटवर अपलोड केल्याने अनेक जण तिच्यासोबत अश्लील भाषेत
संवाद साधू लागेले. त्यावेळी हा प्रकार तिच्या लक्षात आला.

तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार केली होती.
त्यांनी पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे (Police Inspector Kale) करीत आहेत.
आरोप अमेय दबडे याचे वडील सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून
पोलीस खात्यातून काही महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title :-  Pune Crime | A college girl was stabbed to death in broad daylight due to a love affair, an incident in Aundh area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

Bindi Controversy | अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने टिकली प्रकरणावर केली ‘ही’ पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल