Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिंहगडावर (Sinhagad Fort) सहलीसाठी (Trip) आलेल्या विद्यार्थी हत्ती टाकीत पाय घसरून पडला. या घटनेत तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.18) दुपारी बाराच्या सुमारास घडली. शाहिद मुल्ला (Shahid Mulla) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील (Haveli Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) प्रियदर्शनी स्कूल (Priyadarshini School) मधील 60 विद्यार्थी आणि शिक्षक रविवारी सिंहगडावर सहलीसाठी आले होते. यामध्ये 12 वीत शिकणारा शाहिद मुल्ला हा देखील होता. सिंहगडावरील देवटाके आणि हत्ती टोक परिसरात शाहीद आला. (Pune Crime) पावसामुळे परिसर निसरडा झाला आहे. सततच्या पावसामुळे साचलेल्या शेवाळावरुन शाहीदचा पाय घसरला आणि तो टाकीत पडला. त्यावेळी शिक्षकांनी सिंहगडावर उपस्थित असलेल्या व्यावसायिकांनी याची माहिती दिली. यानंतर अमोल पढेर, विठ्ठल पढेर, आकाश बांदल, विकास जोरकर, तुषार डिंबळे, पवन जोरकर, सूरज शिवतारे यांनी पाण्यात शोध मोहीम राबवली.

 

शाहीदला पाण्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्याचा मृतदेह खेड शिवापूर (Khed Shivapur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सततच्या पावसामुळे देवटाके तसेच हात्ती टाके पाण्याने तुडुंब भरले आहेत.
तसेच परिसरात शेवाळे जमा झाल्याने परिसर निसरडा झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime | A college youth who came for a trip to Sinhagad died after an elephant fell into the tank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…