Pune Crime | सराईत गुन्हेगाराने फोडली डोक्यात बियरची बाटली; धनकवडीत गाड्यांची तोडफोड करीत माजवली दहशत

पुणे : Pune Crime | गोडावून बाहेर दारु पित बसलेल्यांना हटकल्याने सराईत गुन्हेगाराने त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने परिसरातील ४ गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. (Pune Crime)

सचिन धनकवडे Sachin Dhankawade (रा. धनकवडे पाटीलनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) शंकर बिरामणे, मिथुन बिरामणे, साहिल व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथील पाटीलनगरमध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारे शंकर बिरामणे, त्याचा भाऊ मिथुन बिरामणे
व इतर हे फिर्यादी यांच्या गोदामाबाहेरील ओट्यावर दारु पित बसले होते.
त्यांना पाहून फिर्यादी यांनी त्यांना हटकले. आज दिवाळी आहे. तुम्ही आमच्या दरवाज्यात दारु पिऊ नका,
दुसरीकडे जाऊन पित बसा, असे म्हणाले. त्यावर त्यांनी तुला काय करायचे आहे, असे म्हणत त्यांना शिवीगाळ
करुन हाताने मारहाण केली. शंकर बिरामणे याने तुला लय मस्ती आली का, तुला आताच खल्लास करतो,
असे म्हणत हातातील बियरची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी तेथील तीन चाकी पॅगो, छोटा हत्ती व अन्य दोन अशा चार गाड्यांवर दगडफेक
करीत तोडफोड केली. परिसरात शिवीगाळ करीत परिसरात दहशत माजवली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title :-Pune Crime | A criminal broke a bottle of beer on his head; Panic was created by vandalizing cars in Dhankavdi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चौघा तोतया पत्रकारांना अटक, महिला संपादकासह 6 जणांवर FIR

Sharad Pawar | खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्याच्या हाताला धरून बसवले खुर्चीत, म्हणाले – बस इथं..! (VIDEO)