Pune Crime | अवघे पाचवी शिकलेला ड्रायव्हर निघाला ‘हायटेक’ भामटा; कर्जाचे अमिष दाखवून शेकडो गरजवंतांची लाखोंची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अवघे पाचवीपर्यंत शिकलेल्या ड्रायव्हरने (Driver) हायटेक गुन्हेगारांनाही (Hi-tech Criminals) मागे टाकले आहे. फेसबुकवर (Facebook) एका तासात तीन लाखांपर्यंतचे कर्ज देण्याची जाहिरात (Loan Advertising) करून शेकडो लोकांना ७ ते ८ लाखांना गंडा घातला आहे. त्याच्या या अमिषाला फसलेल्यांची जेमतेम ५०० ते दीड हजार रुपयांचीच फसवणूक (Fraud Case) झाल्याने पोलिसांकडेही तक्रार केली नाही, त्यामुळे मागील दोन वर्षांपासून त्याचा हा उद्योग राजरोसपणे सुरू होता. मात्र, दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) एका तक्रारीचा बारकाईने तपास करून त्याला बेड्या घातल्यानंतर हा प्रकार समोर आला. (Pune Crime)

 

विठ्ठल बाबू जरांडे Vitthal Babu Jarande (वय ३३, रा. उरुळी देवाची) याला पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली. त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षाच्या नोकरदाराने तक्रार दिली आहे. २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत हा फसवणुकीचा (Cheating Case) प्रकार ऑनलाइन स्वरुपात घडला.

 

जरांडे याने फेसबुकवर कर्ज देत असल्याची जाहिरात केली होती. त्यावर तक्रारदार यांनी संपर्क साधला असता, आरोपीने त्यांना एका तासात दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदार यांचे आधार व पॅनकार्ड, कॅन्सल चेक आणि एका कागदावर त्यांच्या कामाची माहिती आणि स्वाक्षरीचा नमुना घेतला. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क व कमिशनपोटी पाच हजार २५० रुपये ऑनलाइन स्वरुपात घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर न करता फसवणूक केली, असे तक्रारीमध्ये नमूद आहे. आरोपीने याच प्रकारे आणखी एकाला चार हजार २५० रुपयांना फसविल्याचे तपासात उघड झाले आहे. (Pune Crime)

विठ्ठल जरांडे याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्याच्या बँक स्टेटमेंटमध्ये त्याने अशा प्रकारे कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. अवघ्या पाचवीपर्यंत शिकलेल्या जरांडे याने फेसबुकवर जाहिरात केली होती. कर्जासाठी संपर्क साधणार्‍यांकडून सुरवातीला ५०० रुपये फी घ्यायचा. यानंतर त्याने ही १ हजार २५० रुपयांपर्यंत वाढविली. ही रक्कम कमी असल्याने जरांडे याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतरही फसवणूक झालेले लोक पोलिसांकडे जावून तक्रार करणे टाळत होते. त्याने बहुतांशवेळा गुगल पे व ऑनलाईनच ही रक्कम स्वीकारली होती. त्यामुळे जरांडे याचे धारीष्टय वाढत गेले. यानंतर त्याने वेळोवेळी नंबर बदलून हा उद्योग सुरूच ठेवल्याचे समोर आले आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (Assistant Commissioner of Police Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन (Senior Inspector Abhay Mahajan),
विजय खोमणे, उपनिरीक्षक अक्षय सरवदे (Sub-Inspector Akshay Sarwade)
यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

जरांडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने किती जणांची फसवणूक केली.
यातून मिळालेले पैसे कोणत्या बँक खात्यावर घेतले आहेत, त्यातून स्थावर अथवा जंगम मालमत्ता खरेदी केल्या आहेत
का, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे.
त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वर्षा असलेकर (Advocate Varsha Asalekar) यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य करत ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.

 

Web Title :- Pune Crime | A driver who only learned fifth grade turned out to be a ‘high-tech’ bogeyman; Hundreds of needy people were cheated out of lakhs by showing the lure of loans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

T20 World Cup 2022 | ‘हे’ 4 स्टार खेळाडू टी-20 विश्वचषकातून झाले बाहेर

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त