Pune Crime | पाषाण परिसरात मद्यपी रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण, उपनिरीक्षकही जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भर रस्त्यात दारुच्या नशेत कारवर दगड मारुन तिचे नुकसान केल्याने पोलीस समजावून सांगत असताना त्यांना मारहाण करण्याचा प्रकार पाषाण (Pashan) येथे बुधवारी मध्यरात्री घडला. या रिक्षाचालकाला (Rickshaw Driver) पकडून पोलीस व्हॅनमधून (Police Van) नेत असताना त्याने दरवाजा जोरात आपटल्याने त्यात पोलीस उपनिरीक्षकाचे (Police Sub Inspector) बोटाला दुखापत झाली.

 

अनिल प्रकाश सदाशिव Anil Prakash Sadashiv (वय ३२, रा. निम्हण आळी, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण, मुळ रा. अकोला) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

 

याप्रकरणी पोलीस नाईक दत्तात्रय बाळशिराम गेंगजे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७४/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे सहकारी पोलीस शिपाई जारवाल हे बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाषाण सुस रोडवर (Pashan Sus Road) पेट्रोलिंग करीत होते. पाषाण येथील हॉटेल रोनिता (Ronita Hotel, Pashan) जवळ अनिल सदाशिव हा दारु पिऊन रिक्षा चालवत होता. त्याने बाजूला उभ्या असलेल्या एका होंडा कारच्या मागील भागाचे डिक्कीवर दगड मारुन नुकसान करीत होता. (Pune Crime)

कारमधील दोघांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. ते ऐकून पोलीस मदतीसाठी पोहचले.
त्यांनी अनिल सदाशिव याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादीसोबत झटापट करुन शर्टचे बटण तोडले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्य बसवत असताना त्याने कारचा दरवाजा जाणीवपूर्वक जोरात आपटला.
त्यात पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी (PSI Basavraj Mali) यांचे उजव्या हाताचे मधले बोटाला दुखापत झाली.
सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देऊन शांततेचा भंग केला,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A drunken rickshaw driver beaten police in Pashan area and a sub-inspector was also injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Ramdas Athawale | ‘…म्हणून अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही’; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

 

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?