Homeक्राईम स्टोरीPune Crime | राज्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड;...

Pune Crime | राज्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड; आळेफाटा पोलिसांकडून 23 लाखाच्या 45 दुचाकी जप्त

पुणे / आळेफाटा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्यातील विविध भागात जबरी चोरी (Robbery) आणि दुचाकी चोरणाऱ्या (Bike Theft) अट्टल चोरट्यांच्या आळेफाटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Arrest) आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 23 लाख रुपये किमतीच्या 45 दुचाकी जप्त (Bike Seized) करुन 34 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी 4 जणांना अटक करुन 23 लाखाचा मुद्देमाल (Pune Crime) जप्त केला.

 

 

प्रमोद लक्ष्मण सरकुंडे Pramod Laxman Sarkunde (वय-26), ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे Dnyaneshwar Ranganath Bibve (वय-22), गणेश फक्कड कारखिले Ganesh Fakkad Karkhile (वय-23 तिघे रा. निघोज. जि. अहमदनगर), आदील मुख्तार अहमद कुरेशी Adil Mukhtar Ahmed Qureshi (वय-21 सध्या रा. निघोज मुळ रा. बनकटवा, ता. उतरौला, जि. बलरामपुर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी येथे 29 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शांताबाई बबन पावडे (Shantabai Baban Pavade) या नगर कल्याण हायवेवर (Nagar Kalyan Highway) उभ्या असताना एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेले होते. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपास पथकाने आळेफाटा, राजुरी (Rajuri), गुंजाळवाडी (Gunjalwadi), बेल्हे (Belhe) भागातील सीसीटीव्ही व तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी निघोज (Nighoj) येथील असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी प्रमोद सरकुंडे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.

 

आरोपी प्रमोद सरकुंडे याच्यावर 2021 मध्ये तोफखाणा पोलीस ठाण्यात (Pofkhana Police Station) वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याअनुशंगाने पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी आरोपीने त्याचे साथिदार बिबवे, कारखिले आणि कुरेशी यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना निघोज येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी आळेफाटा (Alephata), नारायणगाव (Narayangaon), ओतुर (Otur), शिरुर (Shirur), रांजणगाव (Ranjangaon), शिक्रापुर (Shikrapur), पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), हिंगोली (Hingoli), औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik) भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 23 लाख रुपये किमतीच्या 45 दुचाकी जप्त करुन 34 गुन्हे उघडकीस आणले असून उर्वरित वाहन मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे
आळेफाटा पोलीस स्टेशन (Alephata Police Station) -2, नारायणगाव पोलीस स्टेशन (Narayangaon Police Station) – 1, ओतुर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) -1, शिरुर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) – 4, शिक्रापुर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) -1, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Station) – 3, चंदननगर पोलीस स्टेशन (Chandannagar Police Station) -3, बंडगार्डन पोलीस स्टेशन (Bundgarden Police Station) – 1,

फरासखाना पोलीस स्टेशन (Faraskhana Police Station) -1, येरवडा पोलीस स्टेशन (Yerawada Police Station) -1, लोणीकंद पोलीस स्टेशन (Lonikand Police Station) -3, चाकण पोलीस स्टेशन ((Chakan Police Station) -3, चिखली पोलीस स्टेशन (Chikhali Police Station) -1, पारनेर पोलीस स्टेशन (Parner Police Station) – 2, कोतवाली पोलीस स्टेशन (Kotwali Police Station) -2, शिर्डी पोलीस स्टेशन (Shirdi Police Station) -1, दिंडोरी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण (Dindori Police Station Nashik Rural) -1, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन (Hingoli Rural Police Station) -1, रबाळे पोलीस स्टेशन, नवी मुंबई (Rabale Police Station, Navi Mumbai) -1, एमआयडीसी वाळुंज पोलीस स्टेशन (MIDC Walunj Police Station) -1

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे (Sub-Divisional Police Officer Junnar Division near Mandar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (Police Inspector Pramod Kshirsagar),
सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर (API Sunil Badgujar),
महिला पोलीस उपनिरीक्षक रागीनी कराळे (PSI Ragini Karale),
सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे (ASI Chandrasekhar Dumbare),
पोलीस अंमलदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, प्रकाश जढर, लहानु बांगर, अमित माळुंजे,
पंकज पारखे, संजय शिंगाडे, पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे, मोहन आनंदगावकर, पोलीस मित्र प्रतिक जोरी,
नामदेव पानसरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व पोलीस नाईक संजय शिंगाडे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A gang of two-wheeler thieves from different parts of the state has been arrested; Alephata police seize 45 two-wheelers worth Rs 23 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक ! 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात, आज फैसला

 

Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

 

Pune MHADA Lottery 2022 | पुण्यात म्हाडाकडून तब्बल 5 हजार घरांची सोडत; जाणून घ्या सोडत कधी निघणार अन् अर्ज प्रक्रिया

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News