Pune Crime | स्वारगेट परिसरात प्रवाशांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्वारगेट एसटी स्थानक (Swargate ST Station) परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch Unit -2) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन दुचाकी, मोबाईल, मिरची पूड, गज असा 2 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

अक्षय किशोर शिंदे (वय 28, रा. केशवनगर, मुंढवा), सतीश दशरथ साळुंखे (वय 50, रा. रासकर मळा), अनिल शंकर जाधव (वय 40) आणि संदिप बाबुलाल कोरी (वय 27, रा. पर्वती दर्शन) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट परिसरातील कालव्याजवळ सापळा रचून चार जणांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Kranti Kumar Patil),
सहायक निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale), उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble),
राजेंद्र पाटोळे, शंकर नेवसे, संजय जाधव, कादीर शेख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | A gang robbing passengers in Swargate area busted by Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक