Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास

पुणे : Pune Crime | दिवाळीत घराची साफसफाई करण्यासाठी बोलाविलेल्या कामगारांनी बांधकाम व्यावसायिकाच्या (Construction Businessman) घरातून दोन लाखांची हिरेजडीत सोन्याची अंगठी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगारांच्या विरोधात हडपसर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला. हडपसर भागातील एका सोसायटीत घटना घडली. (Pune Crime)

या प्रकरणी मनोज चव्हाण (Manoj Chavan) आणि युवराज शेलार Yuvraj Shelar (दोघेही रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. युवराज बाळासाहेब घावटे Yuvraj Balasaheb Ghavte (वय ३४, रा. एम्पायर टावर, अमनोरा, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

दिवाळीनिमित्त सदनिकेची साफ सफाई करायची नोंदणी ॲपवर घावटे यांनी केली होती.
कंपनीतील पाच कामगार घावटे यांच्या सदनिकेची साफसफाई करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी आले होते.
मनोज चव्हाण आणि युवराज शेलार यांनी घावटे यांच्या शयनगृहात साफसफाई केली. सफाईचे काम करुन पाच कामगार सायंकाळी गेले. शयनगृहातील टेबलवर ठेवलेली दोन लाखांची हिरेजडीत सोन्याची अंगठी चोरीस गेल्याचे घावटे यांच्या लक्षात आले.

Web Title :-  Pune Crime | A gold ring was stolen from a builder’s house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’